शैव उत्सव
मोक्षदा एकादशी बद्दल प्रश्न विचारला आहे म्हणून सांगतो
मोक्षदा एकादशी म्हणजे मोक्ष मिळवण्याचा ठाम निश्चय करून भगवान शंकरांनी कैलासाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले तो दिवस मोक्षाच्या दिशेने मानव जातीने टाकलेले हे पहिले पाऊल होते म्हणून ते साजरे केले जाते मधल्या काळात मोक्षदा एकादशी गायब झाली होती परंतु पुन्हा एकदा तिचे पुनर्जीवन झालेले दिसते या एकादशीलाच वैष्णव लोकांनी गीता जयंती मानलेले आहे कारण या दिवशी अर्जुनाला भगवदगीता सांगितली गेली अशी त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे वैष्णवांच्या दृष्टीनेही हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे एकंदरच मोक्षाच्या संदर्भात हा दिवस अतिशय महत्त्वाचा असे म्हणायला हरकत नाही
हा दिवस कसा साजरा करायचा याची एक पद्धत आहे सर्वसाधारणपणे तुमच्या आसपास ज्याला मोक्ष मिळालेला आहे त्याच्याकडे जाऊन आज मोक्षाची दीक्षा घेतली जाते कोणी आसपास नसेल तर मग शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करणे, अभिप्रेत आहे तुम्ही योगी असाल तर आज संपूर्ण दिवसभर राजयोग करणे गरजेचे आहे तुम्ही ज्ञानोपायी असाल तर तर आजच्या दिवशी ज्ञानो पाय अंमलात आणणे गरजेचे आहे
हीच गोष्ट तंत्र उपाय आणि क्रिया उपाय यांच्याबाबत लागू आहे
वैष्णव लोकांची श्रद्धा वेगळी आहे ते असे मानतात की आजच्या दिवशी भगवान कृष्णाची पूजा केली कि मोक्ष मिळतो ज्यांची कोणाची अशी श्रद्धा असेल त्यांनी त्या दिशेने जायला हरकत नाही कारण श्रद्धा ही फार वैयक्तिक गोष्ट होते
मला शैवाचार्य म्हणून विचाराल तर अशी कुठल्याही व्यक्तीची एक दिवस पूजा करून मोक्ष मिळत नाही अन्यथा गीता सांगायची गरज भासली नसती थेट आज माझी पूजा कर म्हणजे मोक्षाला उपलब्ध होशील असे सांगितले गेले असते
मी शैव लोकांना इतकेच सांगतो मोक्षात शॉर्टकट नसतात तुम्हाला कुठल्या ना कुठल्या उपायाने साधना करावीच लागते एवढे जरी यानिमित्ताने कळले तरी खूप झाले
श्रीधर तिळवे नाईक
दत्तात्रय संप्रदाय आणि त्याचा पडलेला प्रभाव श्रीधर तिळवे नाईक
गेल्या दोन वर्षात भारतीय सांस्कृतिक इतिहासामध्ये जे काही महत्त्वाचे बदल घडले त्यातील एक म्हणजे शैव धर्म सर्व ठिकाणाहून हटवणे साहजिकच दत्तात्रयांच्या संदर्भातल्या सर्वशैव पोस्ट या हळूहळू गायब झालेल्या दिसतात कोषामधला सुद्धा या यासंदर्भातला भाग आता गायब झालेला दिसतो हे करण्यामागचे उद्देश काय आहेत हे कळणे कठीण आहे पण एकंदरीत संपूर्ण संस्कृती ही युरेशियन झाली पाहिजे असा अट्टाहास दिसतो आहे
वास्तविक दत्त संप्रदायाचे सर्वात प्राचीन मंदिर हे 400 वर्षापूर्वीचे आहे त्याच्या आधीचे एकही मंदिर महाराष्ट्रात उपलब्ध नाही किंबहुना महाराष्ट्रातला सर्वात प्राचीन धर्म हा शैव धर्म आहे हे सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातली सर्व प्राचीन शैव मंदिरे पुरेशी आहेत महाराष्ट्रात भगवान विष्णूंची प्राचीन मंदिरे मिळत नाहीत कारण महाराष्ट्रामध्ये विष्णू फारसे लोकप्रिय नव्हतेच हीच गोष्ट आपणाला दत्त संप्रदायाबाबत दिसते दत्तात्रयांची प्राचीन मंदिरे महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीतजी आहेत ती अलीकडच्या तीनशे चारशे वर्षातलीं आहेत
महाराष्ट्र बाहेर आणि कर्नाटका बाहेर दत्त संप्रदायाविषयी फारसा गवगवा नाही त्यामुळे अनेक प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला आहे आणि हा गोंधळ वाढतच चाललेला आहे याबाबतीतला शैव इतिहास गहाळ झालाय आणि नवनाथ संप्रदाय कसा आपल्या तालावर नाचेल याची काही लोकांच्याकडून व्यवस्थित काळजी हल्ली घेतली जात आहे
मुळात नवनाथ संप्रदायाचा अर्थच हल्ली चुकीचा घेतला जातो. नवनाथ याचा अर्थ नवे नाथ ! नऊ नाथ न्हवे ! पण एकदा का संख्यात्मक अर्थ लावला की लोक संख्येवरून भांडायला लागतात हे काही लोकांना व्यवस्थित माहिती आहे आणि नेमके हेच आता इथे घडलेले दिसते जैन प्रभाव जसा जसा वाढत गेला तसा तसा नाथ संप्रदायाचा प्रसार ओसरत गेला आणि त्याचे पुन्हा एकदा पुनर्जीवन करण्यासाठी म्हणून जी व्यक्ती पुढे आली ती आसाम मधून आली तिचे नाव होते मच्छिंद्रनाथ! मच्छिंद्रनाथ हे ब्राह्मण नव्हते साहजिकच त्यांना कसे बाजूला काढता येईल हे ब्राह्मण इतिहासकारांनी कायमच पाहिलेले आहे अनेक नाथांच्या जन्म कथा तर पौराणिक पद्धतीने सादर होऊ लागल्या आहेत साहजिकच जास्तीत जास्त क्रेडिट गोरक्षनाथाच्या नावावर होईल या दृष्टीने काळजी घेतलेली आहे प्रत्यक्षामध्ये गोरक्षनाथ सुद्धा गोरखनाथ होते आणि ते पंडित घराण्यात जन्मले होते ब्राह्मण घराण्यात नाही मी मागेच बोललो आहे की शैव धम्मामध्ये ब्राह्मण नसतात पंडित असतात आणि हे पंडित वर्ण जात मानत नाहीत आणि त्यामुळेच नाथ संप्रदायात त्यांना ब्राह्मण म्हणून म्हणणारे लोक असून सुद्धा गोरखनाथ जात आणि वर्ण मानत नव्हते महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाचे प्रचंड प्रमाण पंडितांच्यात होते आणि बहुतेक सर्व पंडित नाथ संप्रदायाचेच होते जे वर्ण आणि जात व्यवस्था मानत नव्हते यामध्ये निवृत्तीनाथ ज्ञाननाथ आणि एकनाथ सुद्धा येतात पंधराव्या शतका नंतर महाराष्ट्रात पंडितांचा शॉर्टफॉर्म होऊन त्यांना फक्त पंत म्हणण्याची परंपरा सुरू झाली. अगदी मोरोपंत सुद्धा पंडित होते आणि ते बहुदा वर्ण आणि जाती व्यवस्था पाळत नसावेत शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये फक्त पंत होते त्यामुळेच ते जात आणि वर्ण मानत नव्हते म्हणूनच ते शिवाजींना क्षत्रिय आहात की नाही हा प्रश्न सुद्धा विचारत नव्हते किंवा शहाजी महाराजांना सुद्धा त्यांनी कधीही हा प्रश्न विचारलेला नाही हा प्रश्न नेहमीच ब्राह्मण धर्मी ब्राह्मणांनी विचारलेला आहे पंडितांनी नाही पंडित लोकांनी नेहमीच महाराजांना सहकार्य दिलेले आहे आणि महाराजांनी त्यांचा नेहमी आदर केलेला आहे साहजिकच दत्त संप्रदायामध्ये सुद्धा अनेकदा पंडितांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसतो कारण खुद्द दत्त हे नाथ संप्रदायातूनच आलेले होते आणि मी मागेच म्हटल्याप्रमाणे ते नवीन नाथ होते नाथ ह्या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान योग मार्गाने ज्याने मोक्ष मिळवलेला आहे तो सिद्ध पुरुष होय !
शैव धम्मानुसार हिरण्य वंशातील कपिल यांची बहीण अनुसया होती जी स्वतःच नंतर सिद्ध झाली तिचा विवाह दक्षिण भारतीय अत्री नावाच्या साधकाशी झाला हे अत्रि म्हणजे वैदिक ऋषी नव्हेत ते मंत्र रचणारे वैदिक ऋषी होते या उलट हे अत्री शंकराचे भक्त होते आणि इतरत्रही शंकराचे भक्त असणारे अत्रि प्रकट होत राहतात साहजिकच त्यांची सर्व साधना शैव होती पुढे नवरा आणि बायको दोघेही सिद्ध झाले साहजिकच त्यांच्या पोटी जी मुले जन्माला आली ती अत्यंत प्रतिभावंत होती त्या काळामध्ये आर्य आणि अनार्य यांचे संबंध इतके ताणले गेलेले नव्हते साहजिकच मुलांची नावे चंद्रमा दत्तात्रय आणि सुवास अशी ठेवली गेली होती आणि हे तिघेही पुढे सिद्ध झाले आणि साहजिकच कपिल यांचे जे षष्ठीतंत्र होते ते या तिघांनीही आपल्या पद्धतीने पुढे नेले
यातील सुवास होते त्यांना नंतर दुर्वास म्हटले गेले खरे पण प्रत्यक्षात त्यांचे खरे नाव सुवासच होते त्यांचे नाव शंकराच्या परम शिष्य पैकी एक असलेल्या सुवास यांच्या नावाने ठेवले गेले होते आणि त्यांनी आपल्या नावाप्रमाणेच सुवास यांनी मांडलेल्या अवस्था तंत्राला पुन्हा एकदा पुनर्जीवित केले आणि त्याची मांडणी नव्याने केली ज्याचा थेट प्रभाव नंतर आचार्य शंकर आणि नंतर आद्य शंकराचार्य यांच्यावर पडलेला दिसतो त्यातूनच पुढे अद्वैत्वाद उदयाला आला
चंद्रमा हे मात्र ब्रह्मा म्हणूनच काम करत राहिले भगवान बुद्धांच्या बरोबर ज्यांचे संवाद झाले ते ब्रह्मा हे या ब्रह्मा परंपरेतूनच आलेले होते ब्रह्म धर्म सांगणे हे त्या काळामध्ये या ब्रह्मांचे परम कर्तव्य होते गौतम बुद्धाच्या काळातही ते त्यांचेच प्रतिनिधित्व करत होते आणि त्यांनी गौतम बुद्धांशी वाद प्रतिवाद केलेले दिसतात
यांच्यात जे दत्तात्रय होते ते पूर्व भारतात काम करत राहिले त्यांची प्रामुख्याने चार वेदांच्या वर प्रचंड कमांड होती ते वेद म्हणजे १ ज्योतिष ऍस्ट्रॉनॉमी २ आयुर्वेद ३ शस्त्र वेद विशेषतः त्रिशूल चालवण्यात अतिशय प्रवीण होते ४ नाट्यवेद
त्यांचे मामा कपिल ज्यांनी षष्ठीतंत्र मांडले जे पुढे सांख्यतंत्र बनले आणि नंतर सांख्य धर्म बनले आणि शेवटी सांख्य दर्शन बनले ते यांनी आपल्या पद्धतीने पुढे नेले त्यांचा वारसा त्यांनी थेट अंग अथवा वंग देशात सोडला आणि या प्रांतातच यांच्या अनुयायांना दत्त असे आडनाव मिळाले. आज सुद्धा हे आडनाव बांगलादेशामध्ये आणि आत्ताच्या पश्चिम बंगालमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे आणि स्वामी विवेकानंद हे यातूनच पुढे आलेले आहेत आणि हे स्वतःला क्षत्रिय म्हणवतात ब्राह्मण नव्हे कारण कपिलाचा वंश हा हिरण्य वंश म्हणजेच राजवंश होता ज्याला महात्मा फुले यांच्यामुळे अलीकडे बळी वंश म्हणून ओळखले जाते
पुढे दहाव्या शतकामध्ये कर्नाट म्हणजे आत्ताचा महाराष्ट्र व कर्नाटक एकत्र असलेल्या या प्रांतात आणखी एक नाथ नाथ संप्रदायामध्ये दत्त म्हणून जन्माला आले त्यांचे मूळ कुठे सापडेना तेव्हा ही आधीच्या होऊन गेलेल्या दत्तात्रयांची शैव कथा त्यांना जोडण्यात आली त्यांचे वैष्णवीकरण करण्यात आले आणि त्यातूनच आत्ताचे दत्त रूप आपल्यापुढे उभे राहिले आहे मात्र आश्चर्यकारकरीत्या त्यांची जी मूर्ती दाखवली जाते त्यामध्ये अलीकडे उभा नाम मधल्या विष्णु चेहऱ्याला आणि ब्रह्माला आणि शंकराला मात्र आडवा नामच दाखवला जातो दत्त संप्रदायात पादुका फार महत्त्वाच्या मानल्या जातात आणि त्या अनुक्रमे डाव्या आणि उजव्या पायात शिव आणि शक्तीच्या प्रतीक मानल्या जातात
भारतामध्ये युरेशियन संस्कृती आणि अनार्यांची शैव संस्कृती यांचा मिलाफ घडवण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी प्रयत्न केले किंबहुना हिंदुधर्माची सुरुवात ही आद्य शंकराचार्यांनीच केली असे प्रमेय मी मांडून ते सिद्ध केले होते हा हिंदू धर्म अर्थातच शैवांच्या प्रभावाखाली अधिक होता नंतर तो हळूहळू कसा वैष्णव लोकांच्या ताब्यात गेला तेही मी सांगितले होते आणि याची सुरुवात रामानुजाचार्य यांनी केली हेही सांगितलेले आहेच
आद्य शंकराचार्यांच्या नंतर ज्याला आपण दुसरे सिंथेसिस म्हणू शकतो असे सिंथेसिस या दत्तात्रयांनी केले आद्य शंकराचार्यांनी फक्त वैष्णव आणि शैव एकत्र आणले होते आणि ते ब्रह्म दर्शन या मूळ वेदांताशी जोडून सादर केले होते म्हणजे आद्य शंकराचार्यांनी धर्म एकत्र आणले त्याउलट ज्याला आपण आज हिंदू धर्म म्हणतो त्यात दत्तात्रय नाथांनी आद्य शंकराचार्य यांच्या पुढे जाऊन ब्रह्मा विष्णू आणि शिव असे तिन्ही देव एकत्र आणले आणि त्यांना अनुक्रमे जगाचा निर्माता जगाचा सांभाळ करणारा आणि जगाचा विनाश करणारा असे रूप देऊन एक नवा सिद्धांत मांडला हिंदू धर्माचा पुढे हा एक मुख्य सिद्धांत होत गेला आणि आता हिंदू धर्मात ही त्रयी स्वीकारली जाते म्हणजेच आद्य शंकराचार्यांनी शैव धर्म, ब्रह्म धर्म आणि वैष्णव धर्म असे तीन धर्म एकत्र आणले तर दत्तात्रयांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश असे तीन देव एकत्र आणले आणि आजच्या हिंदू धर्माचे हे मूळचे सिंथेसिस आहे आणि आश्चर्यकारकरीत्या ज्यांनी हे सिंथेसिस घडवले ते दोघेही मूळचे शैव आहेत
आजचा जर हिंदूधर्म पाहिला तर आपणाला आद्य शंकराचार्य आणि आद्य दत्तात्रय यांच्या प्रचंड प्रभावाची स्पष्टपणे जाणीव होते
दत्तात्रयांचा आणखी एक प्रभाव म्हणजे त्यांनी महानुभवांची पार्श्वभूमी तयार केली. संत चक्रधर यांनी मांडलेल्या नववैष्णववादाच्या आधी या देशांमध्ये प्रथम दत्तात्रय संप्रदाय तयार झाला हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंबहुना महानुभव लोकांनाच दत्तात्रयांची व्यवस्थित मांडणी करावी लागली आणि आज सुद्धा त्यांनी जे रचले आहे ते सर्वाधिक पापुलर आहे
कीं चैतन्यकनकाचा लांबणदीवा :
आत्रीवंशआनंदकुळैवा
कीं स्वयंप्रकाश आखंड लाखवा
: जीवोद्धरणाचा
कीं सर्वशक्तीचा मेळीं :
परज्ञानचक्रगोंदळीं :
आनंद प्रकटला भूतळीं :
जीवा उदो करीतु
असे श्री रवळोबास यांनी त्यांच्या सह्याद्री वर्णन या ग्रंथात दत्तात्रयांच्या विषयी म्हटले आहे
नाथ आणि नवनाथ संप्रदायामध्ये शिव हे पारंपारिक आदिनाथ मानले जातात त्यांना रिप्लेस करण्यासाठी म्हणून हळूहळू दत्तात्रयांना आदिगुरु असे संबोधले जाऊ लागले कारण काही करून भगवान शंकर यांना रिप्लेस करणे वैष्णव लोकांना आवश्यक वाटत होते आणि त्या अंगाने अनेक प्रकारचे धार्मिक राजकारण खेळले गेले
महाराष्ट्रामध्ये दत्तात्रयांचे महानुभव लोकांनी दिलेले वर्णन प्रमाण मानले जाते विशेषता माणिक प्रभू यांना दत्तात्रयाचे अवतार मानले जाते
विसाव्या शतकामध्ये दत्तात्रयांना पुढे आणणे अत्यंत आवश्यक बनले कारण हिंदू धर्म जेव्हा नवे रूप धारण करायला लागला तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश असे तिघेही एकत्रीकरणासाठी एकत्र येणे आवश्यक वाटणारा एक मोठा ब्राह्मण लोकांचा समूह होता विशेषता आता ब्राह्मण बनलेले पण पूर्वी पंडित असणारे लोक आणि क्षत्रिय लोक याबाबतीत जास्त पुढाकार घेत होते कारण मुळची शैव परंपरा सोडता येत नाही आणि नव्याने स्वीकारलेली वैष्णव परंपरा त्यागता येत नाही अशी यांची धारणा होती साहजिकच अशा प्रकारचे तिन्ही देवतांना सामावून घेणारे सिंथेसिस त्यांना हवेच होते आणि म्हणूनच मग दत्तात्रय संप्रदाय अधिक फोफावत गेला मात्र अशी गरज महाराष्ट्र आणि कर्नाटकांच्या बाहेर का जाणवली नाही हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे आणि यातच महाराष्ट्रात आणि कर्नाटकातच का आर्य संस्कृती झिरपली त्याचेही उत्तर आहे केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधले पंडित कमजोर निघाले कारण या दोन राज्यांच्या मध्ये सर्वाधिक स्वागत आद्य शंकराचार्यांचे झाले ते तमिळ आणि तेलगू संस्कृतीत झाले नाही त्या उलट तमिळ आणि तेलुगु मधले पंडित हे सशक्त होते त्यांनी शेवटपर्यंत शैव-धर्माचा त्याग केलाच नाही परिणाम एवढाच झाला की केरळमध्ये हळूहळू ब्राह्मणी हिंदू धर्माला कंटाळून अनेक लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला परिणामी तिथे शैव धर्म ओसरला आणि वैष्णव धर्म हा प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेचा भाग बनला इतका कि केरळमध्ये जेवढी कडक वर्ण व्यवस्था आली तितकी भारतामध्ये कुठे आली नाही झाली नाही परिणामी ख्रिश्चन धर्माला हळूहळू शिरकाव मिळाला आणि सरते शेवटी तिथे कम्युनिस्ट राज्यव्यवस्था जास्त प्रस्थापित झाली
सुदैवाने कर्नाटकामध्ये लिंगायत धर्म संस्थापक बसवेश्वर झाल्याने कर्नाटक पुन्हा एकदा वाचला परंतु महाराष्ट्र मात्र पंडित लोकांनीच शैव धम्माचा त्याग केल्यामुळे युरेशियन प्रभावापासून वाचू शकला नाही आणि त्यामुळेच महाराष्ट्रामधूनच ब्राह्मण धर्माचे किंवा हिंदुत्ववादाचे तत्त्वज्ञान सांगणारे लोक निर्माण होत राहिले आणि आज अवस्था अशी आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सत्ता प्रस्थापित झालेली आहे साहजिकच दत्त संप्रदाय वाढता ठेवणे हे हिंदुत्ववादाला अत्यंत आवश्यक असल्याने तो वाढतच जाणार आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही एक है तो सेफ है जर खरोखर अमलात आणायचे असेल तर दत्त संप्रदाय ही एक फार चांगली सिंथेसिस करणारी तत्वभूमी आहे ती भारतीय जनता पक्ष नांगरल्याशिवाय गप्प बसणे शक्यच नाही
यामध्ये खरी कसोटी शैव लोकांची लागणार आहे कारण मूळचे दत्त असोत किंवा दहाव्या शतकातले नाथ संप्रदायातले दत्त असोत हे दोघेही मूळचे अस्सल शैव होते त्यांना असे काही रूप दिले जाईल याची कल्पना शैव लोकांनी केली सुद्धा नव्हती असो ज्या लोकांना स्वतःच्या धर्माची काळजी नसते ते लोक स्वतःच्या धर्मासकट शेवटी स्वतःच बुडतात इराण हे याचे उत्तम उदाहरण आहे तिथला पारसी धर्म आता औषधाला सुद्धा शिल्लक नाही शैव सुद्धा आता या दिशेने वाटचाल करणार आहेत का हा खरा प्रश्न आहे
शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक
महा कुंभ मेळा , बहुतंत्रता आणि धार्मिक आखूडगिरी श्रीधर तिळवे नाईक
कुंभमेळा हा नेमका कशासाठी आहे याची चर्चा मी यापूर्वी अनेकदा केलेली आहे बारा महिन्याचे एक आवर्तन म्हणजे वर्षातून एकदा सिंहस्थ , बारा वर्षांचे एक आवर्तन म्हणजे कुंभमेळा , बारा कुंभमेळ्यांचे आवर्तन म्हणजे महा कुंभमेळा अशी ही शैव योजना आहे यावर्षी असे महा कुंभमेळा असे आवर्तन आल्याने त्याचा गाजावाजा केला जाणार हे स्पष्ट होते परंतु अचानक भाजपने आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी यामध्ये उडी घेतली आणि बघता बघता हा इव्हेंट धार्मिक सत्ता कारणाचा आणि शक्ती प्रदर्शनाचा इव्हेंट होऊन गेला
मी हे अनेकदा सांगितले आहे की शैव धारेमध्ये भगवान शंकरांनी ११४ तंत्रे सांगितली असे म्हटले जाते पुढे त्यांनी ही तंत्रे १ योग उपाय म्हणजे शरीर उपाय २ शाक्त उपाय म्हणजे शक्ति केंद्र उपाय ३ क्रिया उपाय म्हणजे ॲक्शन सेंटरीक उपाय ४ ज्ञान उपाय ५ भाव उपाय म्हणजेच अलीकडच्या काळातील भक्ती अशा पाच उपायांच्यात विभागली आणि या पाचही उपायांचे दळणवळण याशिवाय सर्व प्रकारच्या ज्ञानाचे दळणवळण करण्यासाठी कुंभमेळा जन्माला घातला गेला साहजिकच हा शैव धर्माचा ११४ तंत्रांचा आणि ज्ञानाचा दळणवळण उत्सव होता
साधारणपणे इसवी सन पूर्व नवव्या किंवा दहाव्या शतकामध्ये नकुलिश यांनी पाशुपत नावाचा पहिला अधिकृत धर्म स्थापन केला आणि हिरण्य वंशाचा राजाश्रय मिळवला त्याआधीही या धर्माची स्थापना झालेली होती परंतु त्याचे नेमके स्वरूप उपलब्ध नाही त्यावर वेगळे लिहिलेले आहे साहजिकच महाभारतामध्ये सुद्धा पाशुपत धर्माचा आणि दर्शनाचा उल्लेख आहे याशिवाय बळी वंशाची कथा आपल्याकडे परंपरेमध्ये सतत चालत आलेली आहे आणि हा वंश पाशुपत होता हे खुद्द पुराणांनीच मान्य केलेली आहे आणि वैष्णव आणि शैव यांच्यातील वाद हा नंतर रंगवला गेला आणि साहजिकच हिरण्य वंशाचे राज्य हा त्या वादाचा क्षेत्र बनवण्यात आला. साहजिकच हिरण्यकश्यप आणि त्याचा नरसिंह अवताराने केलेला वध हा एक मूल आकृतीबंध तयार झाला मात्र हा आकृतीबंध सादर करताना वैष्णव धर्माने नेहमीच एक गोष्ट लपवली ती म्हणजे हिरण्य हा शैव वंश आहे त्यानें शिवाची भक्ती स्वीकारलेली आहे आणि नंतर आलेल्या वैष्णवांना ठामपणे दिलेला नकार हे त्याचे वैशिष्ट्य आहे परंतु वैष्णव लोकांनी आणि काँग्रेसची लोकांनी कायमच हिरण्यकशपूची कथा त्याच्यानंतर प्रल्हादाची व बळीची कथा ही हीरण्य वंश हा वैष्णव धर्माचा शत्रू एवढ्याच रूपात सादर केली मात्र हे सर्व लोक एकाच वंशाचे आणि शैव होते हे मात्र कायमच लपवण्यात आले कारण शेवटी काँग्रेस सुद्धा वैष्णववादी होती गांधीवादाचा हा परिणाम होता महात्मा गांधी हे शैव धर्माविषयी व्यवस्थित मौन पाळून होते आणि काँग्रेसने गांधी यांची ही परंपरा पुढे चालवली पुढे पुढे तर नकुलिश यांचे नाव कसे इतिहासातून लुप्त होईल याची काळजी घेण्यात आली आणि त्या जागी लकुलिश या ब्राह्मणाचे कसे हे पाशुपत दर्शन आहे हे सांगायला सुरुवात केली गेली आणि आज अवस्था अशी आहे की पाशुपत दर्शन म्हटले की लकुलिश यांचे नाव येते कारण ते ब्राह्मण होते यालाच महात्मा फुले भटांचा कावा म्हणतात विसाव्या शतकात तो पाशुपत दर्शनाबाबत व्यवस्थित काँग्रेसने चालवला आणि अलीकडे आश्चर्यकारकरीत्या भाजप सुद्धा हेच करत आहे म्हणूनच भाजप काय किंवा काँग्रेस काय शेवटी अंतिमतः वैष्णवच असतात वर आणि पुन्हा असा काही वाद अस्तित्वात नाही असे म्हणून हे लोक मोकळे असतात जणू काय यांच्या सगळ्या दंतकथांच्या मध्ये शैव कसे सुखाने राहत आहेत असे हे प्रोजेक्षण असते त्यामध्ये सगळे शैव कसे काय नेमके ओबीसी आणि पंडित आणि बीसी आणि आदिवासी आणि शूद्रांच्यात ढकलले गेलेले लढाऊ समुदाय असतात याविषयी मात्र सोयीस्कर मौन म्हणून पाळलेले असते यातल्या पंडितांनी तर शैव धर्माचा त्याग केला की काय अशीच आता शंका येते काँग्रेसने न्याय दिला नाही म्हणून भाजप तरी किमान न्याय देईल अशी शैव लोकांची समजूत होती परंतु दुर्दैवाची गोष्ट असे की शैव मते फक्त राजकारणासाठी वापरायची आणि हळूहळू शैव-धर्म नष्ट करत नाहीसा करायचा एवढाच उद्देश भाजपाचा आहे असे आता चित्र निर्माण झालेले आहे महा कुंभमेळा हा शैव लोकांच्याकडून पद्धतशीरपणे काढून घेऊन त्याचे हिंदूकरण करण्याच्या नावाखाली वैष्णवीकरण करायचे अशी स्पष्ट आणि स्वच्छ योजना आता समोर आलेली दिसते याचा प्रतिकार करणे अटळ होते तो केला गेला आणि पुन्हा एकदा शैव लोकांनी हर हर महादेव म्हणत प्रचंड गर्दी करून हे कारस्थान हाणून पाडले
काँग्रेस शैव धर्माच्या बाबतीत किती उथळ आहे आणि उदासीन आहे हे नेहमीच सिद्ध झालेले आहे मुळात इंग्रजांच्या विरोधात १९ व्या शतकात छोटी-छोटी बंड करून शैव-धर्म थकून गेला खुद्द ब्रिटिशांना सुद्धा तो नकोच होता आणि म्हणूनच त्या विरोधात इस्लाम धर्माची सेवा करणारा आणि त्यांच्याप्रमाणेच भक्ती प्रधन असलेला वैष्णव धर्म वाढीला लागेल याची काळजी घेण्यात आली. त्यामागे ब्राह्मण इंग्रज राजवटीची सेवाच करतील आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय इंग्रज राजवटीची वफादार राहतील ही स्ट्रॅटेजी होती जी यशस्वी झाली थोडे भारतीय लोकांनी विशेषता शैव धर्मीय लोकांनी शस्त्रे बाळगून आहेत म्हणून निशस्त्र असलेला विठ्ठल वाढवण्यात आला वारकरी संप्रदाय वाढवण्यात आला कारण मराठ्यांचे गंडस्थळ हे महाराष्ट्रात होते त्याचबरोबर भारतामध्ये जाणीवपूर्वक काही विषय च प्रचार करणारे बौद्ध धर्म व जैन धर्म वाढीला लागतील अशी काळजी घेण्यात आली कारण हे अंतिमतः युरेशियन धर्म होते ज्याच्याशी युरोपियन वसाहत वादाला नाते जोडता येणे सहज शक्य होते साहजिकच विसावे शतक हे हिंदू धर्माच्या नावाखाली आलेला वैष्णववाद आणि ब्राह्मणवाद यांचे होते या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी हरहर महादेव अशी घोषणा देऊन भाजपमध्ये वेगळे चैतन्य निर्माण केले तेव्हा सर्वच्या सर्व ओबीसी बीसी आणि आदिवासी हळूहळू नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहिले दुर्देवाची गोष्ट अशी की खुद्द नरेंद्र मोदी यांना आपल्याला मिळालेल्या पाठिंब्याचे रहस्य कळालेले दिसत नाही आणि आज अवस्था अशी आलेली आहे की सर्व गोष्टीविषयी आणि पाठिंबाविषयी आता पुनर्विचार करावा हीच गोष्ट आदित्यनाथ योगी यांच्याबाबत आहे ते गोरख मठाचे आहेत आणि गोरखनाथ हे शैव होते याचा विसर त्यांना पडला आहे की काय अशी आता शंका येते आहे अर्थात महा कुंभमेळ्यात मात्र पुन्हा एकदा हर हर महादेव अशी घोषणा या दोघांनीही दिलेली आहे मात्र ती किती स्वरूपात कायम स्वरूपात राहील याविषयी शंका आहे दुसरी गोष्ट सामान्य माणसांचे प्रश्न सोडवणे हे अत्यंत आवश्यक आहे केवळ धार्मिक आभास निर्माण करून सामान्य माणसाचे प्रश्न सुटतील यावर शैव धर्माचा विश्वास नाही हे आता सांगायची वेळ आलेली आहे
तुम्ही म्हणाल की या सगळ्याचा आत्ताच्या चर्चेची काय संबंध आहे हा संबंध आहे कारण नकुलीश यांनी ब्राह्मण धर्माविरोधात पहिले बंड केले होते आणि त्याला बळी वंशाचा राजकीय आधार होता पद्मपुराणामध्ये स्पष्ट आणि स्वच्छपणाने हिरण्यकश्यप हा पाशुपत होता असा उल्लेख आहे ही एक नवी राजकीय व्यवस्था होती. जिला पुढे बळीने फार मोठा आधार पुरवला तिच्यात फूट पाडण्यासाठी म्हणून मग प्रल्हादाची काल्पनिक कथा निर्माण करण्यात आली आणि प्रल्हाद विष्णू भक्त म्हणून दाखवण्यात आला जे प्रत्यक्षात असत्य होते जर असे असते तर प्रल्हादाची हत्या नंतर करावीच लागली नसती बळी वंशातल्या प्रत्येक राजाची राजकीय हत्या का करावीशी वाटली हा खरे तर कळीचा प्रश्न आहे आणि पाशुपत दर्शनाच्या इतिहासात तो वारंवार विचारला जातो माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे की यामागे नकुलीश यांचे धनगर असणे आणि त्यांनी दिलेला धर्म किंवा धर्म हा समतावादी असणे हे खरे कारण आहे अशा प्रकारची समता ज्यांना नको होती त्यांनीच हा सगळा प्रकार जास्तीत जास्त दडपण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी मग वेगळ्या पौराणिक दंतकथा उभ्या करून इतिहास लपवला गेला त्यातच बळीराजाची अत्यंत प्रसिद्ध अशी कथा येते तिथे सुद्धा वामन नावाचा छोटा अवतार जो ब्राह्मण आहे बळीराजाला पाताळात गाडतो अशी खोटी रचना केली गेली यामुळे शैवांच्या भावना दुखावल्या जातात याची सुद्धा कसलीही काहीही फिकीर ब्राह्मण धर्म आणि वैष्णव लोकांनी केलेली नाही कारण शैव-धर्माला ते कायमच प्रतिस्पर्धी मानत आलेले आहेत कारण ही लढाई बळीवंशापासूनच सुरू होते आणि महात्मा फुले यांनी हा संघर्ष प्रथमच इतिहासात आणला म्हणूनच या लोकांना महात्मा फुले हे फार मोठे शत्रू वाटत असतात अलीकडे तर काही लोक वामनाचे समर्थन करायला उतरलेले दिसतात याचा अर्थ शैव लोकांनी काय घ्यावा ? या बळी वंशातल्याच कपिल याने पुढे षष्टीतंत्र डेव्हलप केले ज्यातून सांख्य दर्शन डेव्हलप झाले याच वेळेला ब्रह्म दर्शन सुद्धा ब्रह्म तंत्रातून डेव्हलप झाले आणि उपनिषदांच्यातून प्रकट होत गेले याच सांख्य दर्शनातील कपिल याचा प्रभाव पडून महावीर आणि बौद्ध गौतम बुद्ध यांनी आपला धर्म उभा केलेला आहे म्हणजेच एका अर्थाने धर्म राजकीय प्रणाली म्हणून बळी वंशामध्ये विकसित होत गेली आणि ती पुढे ब्राह्मणधर्माने आणि नंतर जैन आणि बौद्ध या धम्माने विकसित केली गौतम बुद्ध हा स्वतःला शास्ता म्हणजेच एका अर्थाने शासक म्हणजेच राजकीय म्हणवून घेतो हाच विचार आपण अधिक नीटपणे पाहिला तर आता आपण असे म्हणू शकतो की तंत्र हे मोक्षिक असते मात्र त्यातून दर्शन किंवा धर्म किंवा धम्म अशा राजकीय विचार प्रणाली विकसित होत असतात त्यामुळे जे लोक महा कुंभमेळ्या मधल्या राजकारणाबद्दल बोलत आहेत त्यांना हे पुन्हा एकदा सांगणे आवश्यक आहे की अंतिमतः दर्शन अथवा धर्म किंवा धम्म ही राजकीय विचार प्रणाली आहे ज्याची सुरुवात नकुलीश यांच्या पाशुपत दर्शनापासून सुरू झालेली आहे आणि दर्शनाला म्हणजेच शैव राजकीय प्रणालीला शह म्हणून धर्म निर्माण करण्यात आला जो स्वतःच राजकीय प्रणाली होता आणि या धर्माला शह देण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा आजीवक जैन आणि बौद्ध हे एक वेगळी नैतिकता घेऊन राजकीय विचार प्रणाली म्हणून उभे राहिले थोडक्यात भारतीय राजकीय प्रणालींच्या संदर्भामध्ये आपणाला दर्शन त्यातून पुढे मग शह देण्यासाठी धर्म आणि धर्माला शह देण्यासाठी म्हणून धम्म अशा प्रकारचा राजकीय विचारांचा इतिहास मांडावा लागतो यातील धर्म हा विषमतेवरच उभा आहे शोषणाच्या बाजूने उभा आहे आणि त्यामुळेच तो पुरोहित आणि शासक राज्यकर्त्याचा कैवार घेत असतो आणि म्हणूनच त्याचा पुढे सर्वाधिक प्रचार होत आपणाला जुडाईक धर्म निर्माण झालेले दिसतात जे स्वतः दुसरे तिसरे काही नसून राजकीय विचार प्रणालीच आहे या सर्व राजकीय विचार प्रणालींचा आधार श्रद्धा आहे फरक आहे तो पद्धतीत आहे दर्शनामध्ये प्रथम प्रचिती येते तर धर्मामध्ये श्रद्धा येते तर धम्मामध्ये आत्मचिकित्सा आणि धर्मचिकित्सा येते पुढे पुढे दर्शन आणि धम्म दोन्हीही ताब्यात घेण्याचा प्रयत्न धर्मांनीच करायला सुरुवात केली भारतामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण धर्म आणि वैष्णव धर्म आणि अलीकडेच हिंदू हा धर्म राजकीय प्रणाली म्हणूनच उदयाला आलेले आहेत आणि म्हणूनच सारे च्या सारे धार्मिक राजकारणच करत असतात या हिंदू धर्माचे दोन गट पडतात एक हिंदूवादी राजकीय प्रणाली आणि दुसरा हिंदुत्ववादी राजकीय प्रणाली यातील पहिल्या हिंदूवादी राजकीय प्रणालीने सेक्युलरिझम स्वीकारून स्वतःची मांडणी केलेली आहे तर हिंदुत्ववादी लोकांनी सेक्युलरिझम नाकारला आहे त्यांनी धर्मवाद स्वीकारला आहे साहजिकच हा धर्मवाद दर्शनाच्या वर आणि धम्मांच्या वर कुरघोडी करण्याचा सतत प्रयत्न करत असतो आणि तसाा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झालेला आहे हा महा कुंभमेळा म्हणजे शैव लोकांच्यावर लादलेली धार्मिक विचार प्रणाली होता प्रत्यक्षात शैव लोकांनी ती स्वीकारली नाही उलट अनेक धर्माच्या लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत शैव लोकांनी एक वेगळेच दर्शन घडवले आहे साहजिकच त्या विरोधात काँग्रेस बोम्ब मारणार आणि सेक्युलर लोक पण बोंब मारणार याची कल्पना होती हे करताना काँग्रेस नेहमी हिंदू धर्म कसा प्लूरल आहे आणि महा कुंभमेळा हा कसा फ्लूरलिझमच्या विरोधात आहे हे सांगणार हे अपेक्षितच होते इंडियन एक्स्प्रेसमध्ये या अंगाने मांडणी आलेली आहे वास्तविक कुंभमेळ्यामध्ये जितका बहुमतवादाचा आदर सामान्य जनमानसांनी दाखवलेला आहे त्याची दखल या लोकांनी घेतलेली नाही हे लोकं आधीच तयार झालेल्या मतानुसार कुंभमेळा पहात आहेत असे स्पष्ट दिसते या लोकांनी भाजप नेते काय म्हणतात यापेक्षा महा कुंभमेळ्यात असलेल्या सर्व लोकांचा जर का मागोवा घेतला असता तर त्यांना काही वेगळे चित्र दिसले असते शैव धर्म हा नेहमीच सर्व धर्मी लोकांनां आपले मंदिर खुले ठेवत असतो माझे स्वतःचे रवळनाथ मंदिर हे ख्रिश्चन लोकांसाठी कायमच खुले असते आणि आमची ख्रिश्चन लोकं तिथे अनेकदा नवस पण बोलतात अलीकडच्या काळामध्ये जेव्हा वारकरी संप्रदाय अतिशय संकुचित होत गेला तेव्हा अत्यंत खुल्या पद्धतीचा एक नवा शैव पंथ शिर्डी मध्ये साईनाथांच्या नावाने शैव लोकांनी प्रचलित करून त्याचा प्रचंड भारतभर प्रसार केला शैव लोक नेमके कसे ऍक्टिव्हेट असतात याची कसलीही कल्पना आपल्याकडच्या तथाकथित विचारवंतांना आणि ओरिएंटल लोकांना असत नाही ते कुठल्यातरी कागदी ताजमहालामध्ये व्यस्त असतात किंवा ब्राह्मणधर्माने पुरवलेल्या डाटाला शरण जात असतात साईबाबा हे शैव-धर्मी लोकांनी तयार केलेले उत्तर आधुनिक दैवत आहे आणि याची नीट कल्पना युरेशियन लोकांना असल्यामुळेच त्यांनी शंकराचार्यांच्याद्वारे त्या विरोधात भरपूर प्रचार केला होता पण हा प्रचार शैव लोकांनी मनावर घेतलेला दिसत नाही अर्थात प्रथेप्रमाणे आत्तापर्यंतचे राजकारण बघता हळूहळू ज्याप्रमाणे बाळू मामा ताब्यात घेतले गेले त्याप्रमाणे साईनाथ सुद्धा ताब्यात घेतले जातीलच आणि नेहमीप्रमाणे शैवलोक उदासीन राहतीलच स्वतःच्या धर्माबाबत आणि परंपरेबाबत प्रचंड उदासीन राहणे ही शैव धर्मी लोकांची सवय होऊन बसलेली आहे
साहजिकच महा कुंभमेळाला राजकीय भानगड म्हणून काँग्रेस विरोध करणार हे स्पष्टच होते समाजवादी आणि मार्क्सवादी विरोध करणार हे स्पष्ट होते तसा तो झाला पण यामुळे या देशातल्या बहुजन असलेल्या शैव लोकांना घंटा काय फरक पडला नाही पडणारच नाही खरे तर शैव लोकांना एका राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाची गरज आहे ही गरज नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलेली आहे असे शैवधर्मी लोकांना वाटत होते प्रत्यक्षात अचानक खुद्द नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम म्हणून शैव धर्मीक लोकांच्या कडे पाठ केल्याने सगळ्याच शैव लोकांची पंचाईत झालेली आहे प्रथम महात्मा फुले नंतर बाबासाहेब आंबेडकर आणि आता नरेंद्र मोदी यातल्या प्रत्येकाने आपल्याच शैव लोकांच्याकडे पाठ केलेली आहे प्रथम महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून आणि तो ख्रिश्चन बनवून शैव धर्माकडे पाठ केली त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून शैव लोकांच्याकडे पाठ फिरवली आणि आता नरेंद्र मोदी यांनी वैष्णव धर्म स्वीकारून शैव धर्माकडे पाठ फिरवलेली आहे महा कुंभमेळ्याच्या चर्चेमध्ये ही गोष्ट अतिशय ठळकपणे समोर आलेली आहे यापुढे कर्मठ लोक कायमच शैव लोकांच्या विरोधात काम करतील हे स्पष्ट आहे त्याचबरोबर डावे असलेली फुलेवादी मंडळी सुद्धा कायमच शैव धर्माच्या विरोधात ठाकतील हे स्पष्ट दिसते आणि आता नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्वाची दिशा बदलण्याऐवजी हिंदुत्वाची पारंपारिक दिशा पत्करल्याने त्यांनीही पाठ फिरवल्यात जमा आहे साहजिकच या सगळ्या मधून जी राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक पोकळी निर्माण झाली आहे ती कशी भरून काढायची हा शै व धर्मी लोकांच्या पुढचा सर्वात मोठा तात्विक प्रश्न आहे एका बाजूला दैनंदिन गरजांच्या मध्ये हा समाज पूर्णपणे गाडला गेला आहे त्याची तिथे प्रचंड परवड चालू आहे जिच्याबद्दल कोणालाच काय पडलेली नाही आणि दुसरीकडे धार्मिक पातळीवर आणि सांस्कृतिक पातळीवर त्याला नष्ट करण्याचे सर्व प्रयत्न सुरू झालेले आहेत अगदी नवं बौद्ध सुद्धा शैव धर्म कसा नष्ट करता येइल तेच पाहत आहे नवबौध्द वारकरी संप्रदायाला स्पष्ट आणि स्वच्छ पणाने मिळालेले आहेत याचा परिणाम काय होईल याची सुद्धा त्यांना कल्पना नाही त्यांना असे वाटते की ओबीसी त्यांच्या बरोबर येतील पण हे होणार नाही कारण भारतभर वारकरी संप्रदाय नाही तिथे शैवधर्मच आहे त्यामुळे महाराष्ट्रातला दिसणारा नकाशा म्हणजे भारताचा नकाशा नव्हे इतकी अक्कल लोकांना येवो अशी आपण प्रार्थना करू शकतो याबाबतीत अलीकडचे एक उदाहरण देतो संभाजी महाराजांच्या छ*** चे चित्र आले आणि आता रिषभ शेट्टी चे शिवाजी महाराजांच्या संदर्भातले पहिले पोस्टर आले तिथे भवानी माता ही स्पष्ट आणि स्वच्छपणाने अत्यंत मोठ्या आकारात उभी आहे आणि शिवाजी महाराज तिचे भक्त म्हणून उभे आहेत कन्नड लोक आपल्या होयसाळ घराण्यातून आलेल्या आपल्या महापुरुषाकडे कसे बघतात त्याचे हे उदाहरण आहे त्या उलट महाराष्ट्रात मात्र शिवजी नष्ट करून शिवाजी आणण्याचे प्रयत्न कायमच झालेले आहेत आणि हे प्रयत्न कायमच ब्राह्मण धर्माने केलेले आहेत वास्तविक शिवजी आहे म्हणूनच शिवाजी आहेत पण हे कोण कोणाला सांगणार? खुद्द शिवाजी महाराज स्वतःच हे सांगत होते परंतु त्याकडे पाठ फिरवणे हा इथल्या तथाकथित अभिजन वर्गाचा उद्योग होऊन बसलेला आहे या लोकांना खंडोबाची आणि तुळजाभवानीची बहुतेक भीती उरलेली दिसत नाही माणसाला त्याच्या आराध्यदेवतेपेक्षा अत्यंत जाणीवपूर्वक मोठे करणे हे ब्राह्मणांचे राजकारण असते त्या राजकारणाला किती बळी पडायचे याला काही मर्यादा असतात या मर्यादा ओलांडल्या जात आहेत सर्वात वाईट गोष्ट म्हणजे यामध्ये पुरोगामी लोकसुद्धा अत्यंत धूर्तपणे सामील होतात कारण त्यांना सुद्धा शैव धर्म नकोसा झालेलां आहे म्हणूनच फुल्यांचे नाव घ्यायचे परंतु फुल्यांचे शैव विचार कुठेही जाऊ नयेत या दृष्टीने धडपड करायची त्यांचा सत्यशोधक धर्मच जाणीवपूर्वक पुढे आणायचा आणि त्यांची शैव बाजू लपवून ठेवायची असा उद्योग पुरोगामी करत असतात यात नवबौद्ध लोक व विचारवंतसुद्धा येतात आत्ताच्या घडीला या सगळ्याला सामोरे कसे जायचे हाच प्रश्न आहे महा कुंभमेळ्याच्या निमित्ताने शैव लोकांनी आपली संघटित ताकद दाखवून दिली हे या कुंभमेळ्याचे सर्वात मोठे यश आहे या यशाची दखल सर्वांनाच घ्यावी लागेल पुरोगामी लोक या देशात कधी सुधारले नाहीत ते पुढे सुधारतील अशी चिन्हे नाहीत त्यामुळे खुद्द शैव धर्मी लोकांनीच आता आपला विचार करावा हे बरे !
जय शिवजी जय भवानी हर हर महादेव
श्रीधर तिळवे नाईक
मराठीतील वट हा शब्द शैव संस्कृतीने ओथंबलेला आहे मुळात त्याचा अर्थ वड हा वृक्ष असला तरी संस्कृत मध्ये त्याचे रूप वट असेच झालेले आहे हा शैव संस्कृतीचा मुख्य वृक्ष आहे एका अर्थाने फ्रॉईडियन भाषेत सांगायचे तर टोटेम!
मराठीत वट असणे याला विशिष्ट अर्थ आहे त्यात प्रतिष्ठा आणि बळ या दोन्हीचा संगम आहे. त्यामुळे समाजात कोणाचा किती वट आहे हे फार महत्त्वाचे मानले जाते वट प्रसिद्धीवर अवलंबून नाही त्यात प्रतिष्ठा फार महत्त्वाची आहे वड हा जसा सर्वत्र फैलावत जातो तसा वट हा ही सर्वत्र फैलावत जातो वट हा वंशवृक्ष आहे कारण त्याला पारंब्या फुटत राहतात वढापासून वाढ शब्द आला आहे कारण वड सतत वाढतो
वट पासून वटवट येते पाल्हाळीक बोलणे त्यात अभिप्रेत आहे अनेक अवांतर पण जोडल्या गेलेल्या कथनांनी वटवट भरलेली असते.
पार म्हणजे पलीकडचे ! पार्वती ही ह्या पाराची स्वामिनी! हा पार प्राचीन काळापासून वटवृक्षाच्या छायेखाली भरतो कारण सर्वांना ऑक्सिजन पुरवण्याची ताकद त्याच्यात आहे आणि तो अखंड वाढत असतो
शैव धर्मातील सर्वोत्तम वृक्षलिंग म्हणजे वट वृक्ष होय शिवाचे बृक्ष रुपात पूजन म्हणजे वट पौर्णिमा! ह्या दिवशी प्रत्येक शेतात वड लावला गेला पाहिजे त्यामूळे पाण्याचा साठा जमिनीत वाढतो गावाची सीमा वडांनी बांधली व घेरली गेली पाहिजे
बाकी सत्यवान सावित्री पुराणकथा आहेत
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment