तिसरे महायुद्ध दारात आले आहे का श्रीधर तिळवे नाईक
इस्लाम आणि इस्लामेतर हा धर्म संघर्ष इस्लाम जन्मल्यापासून सुरू आहे तो कधी थांबण्याची शक्यता ही नाही कारण इस्लामचे अंतर्गत रचनाच तशी आहे ते बदलण्यासाठी नवीन प्रॉफेट ची शक्यता असावी लागते ती शक्यता ही मोहम्मद पैगंबर यांना अंतिम प्रेषित मानल्याने शक्य होत नाही त्यामुळे ही एक बंद झालेली वाट आहे आणि आश्चर्यकारकरीत्या या बंद असणाऱ्या किल्ल्यामध्ये संपूर्ण जग प्रवेश करत आहे ज्यांना ज्यांना पुरोगामी वाद आणि आधुनिक वाद झेपत नाही असे सारे लोक मागच्या दाराने इस्लाममध्ये घुसत असतात त्यामुळे इस्लामिक लोकांची संख्या वाढते आहे हा संघर्ष अस्तित्वात नाही अशी कल्पना करून काही लोक वाळूत डोके खूपसून बसलेले आहेत ही सुद्धा एक टिपिकल हिंदू प्रवृत्ती आहे परिणाम इतकाच झालाय की हिंदू लोकांच्या हातातून त्यांचा ७०% भूभाग हळूहळू निघून गेलेला आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याबद्दलही काही वाटणे आता उरलेले नाही हिंदूंना बधिर करण्यामध्ये सर्वाधिक वाटा हा ब्राह्मण्याचा आहे ब्राह्मण धर्माने स्वतः संवेदनशीलता गमावलीच पण त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतर सर्व हिंदवी धर्मांना संवेदनशीलता गमवणे भाग पाडले आता हा धर्म संघर्ष स्पष्ट आणि स्वच्छ पणाने आंतरराष्ट्रीय पातळीवर अवतरलेला दिसतो आणि त्यातूनच इस्त्राईल आणि इराण यांच्यात आता युद्ध सुरू सुरू झालेले दिसते . इस्लामचा गैरइस्लामवाद इस्रायलला व्यवस्थित कळलेला आहे पण त्यांचे संरक्षणाचे धोरण हे "आक्रमण हे संरक्षण "असे असल्याने एक प्रकारचा जाज्वल आणि अतिरेकी आक्रमकपणा जो अनेकदा आगाऊपणा वाटतो ते दाखवत असतात इथेही हेच घडलेले आहे इराण ह्या देशाने अणुबॉम्ब तयार केला तर तो निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या तरी इस्लामेतर देशावरच टाकला जाणार हे उघड आहे आणि या अणुबॉम्बची दिशा इस्त्राईलच असणार असे इस्त्रायलला वाटते हा अणुबाँब आमच्यावर पडण्याआधीच आम्ही इराणचा बंदोबस्त करतो जेणेकरून ते अणुबाँब तयार करू शकणार नाहीत अशी "आक्रमण हे संरक्षण" या धोरणातून अवलंबलेली पद्धत पुन्हा अवलंबलेली आहे परिणाम इस्त्रायलचा हल्ला!
जोपर्यंत ट्रम्प शुद्धीवर होते तोपर्यंत इस्त्राईल आणि अमेरिका या युतीमुळे पावर ऑफ बॅलन्स टिकला होता पण ट्रम्प हा एक अती शहाणा माणूस आहे त्याने मुस्लिम राष्ट्रांना प्रोत्साहन दिले आणि हा समतोल बिघडवला जी मुस्लिम राष्ट्रे अमेरिकेच्या दबावामुळे इस्त्राईलच्या विरोधात जात नव्हती ती आता प्रथमच इस्त्राईलच्या विरोधात जाताना दिसतात कारण अमेरिका आपल्या विरोधात काही करणार नाही कारण अमेरिकेचे आर्थिक संबंध आपल्या देशात गुंतलेले आहेत याची त्यांना पूर्णपणे आता कल्पना आलेली आहे आणि ट्रम्प यांना इस्त्राईलच्या संदर्भात आपण फाट्यावर मारू शकतो याची खात्री त्यांना पटलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा इस्त्राईल विरोधात मुस्लिम राष्ट्र असा संघर्ष निर्माण झाला आणि त्यातून एक मोठे खंड युद्ध तयार झाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही हे खंड युद्ध महायुद्धात पर्यंत पोहोचेल की नाही याची कल्पना करणे सध्यातरी शक्य नाही पण जर का मुस्लिम देश इस्त्राईल विरोधात संघटित झाले आणि हे संघटन जागतिक झाले तर मात्र तिसरे महायुद्ध इस्लाम विरुद्ध इस्लामेतर होऊ शकते पाकिस्तान इस्रायल विरोधात भूमिका घेणारच घेणार कारण त्याला मुस्लिम राष्ट्रांची मदत आवश्यक वाटते त्यामुळे भारताला पेचातही पकडता येते भारताला कोणाचीही बाजू घेणे संकटातच टाकणारे आहे जर का भारत इस्राईलच्या बाजूने आला आणि पाकिस्तानने भारताविरोधात युद्ध पुकारले तर किमान इराण हे राष्ट्र भारताच्या विरोधात जाणार हे 100% खरे आहे इराणच्या मागोमाग किती मुस्लिम राष्ट्रे जातील हा खरा प्रश्न आहे अफगाणिस्तान आत्ता आपला मित्र असला तरी इस्त्राईलच्या प्रश्नावर तो आपल्या बाजूने येणे शक्य नाही त्यामुळे त्याने तटस्थ अलिप्त भूमिका स्वीकारली तर आश्चर्य वाटणार नाही
सद्दाम हुसेन विरोधात केवळ आण्विक शस्त्रास्त्रे हाच मुद्दा अमेरिकेने आणला होता हाच मुद्दा इस्त्राईलने आला आणला तर मात्र ते चुकीचे असे म्हणता येईल का हा फार मोठा प्रश्न आहे इस्त्राईलची गुप्तचर यंत्रणा ही जगातली सर्वोत्तम यंत्रणा आहे आणि त्यांच्याकडे नक्कीच या संदर्भात काही ना काही माहिती आलेली असणार त्यातूनच आलेल्या असुरक्षिततेपोटी आणि भयापोटी इस्त्राईलने हा हल्ला केलेला आहे भविष्यात आपल्यावर अणूबॉम्ब पडू नये म्हणून केलेला हा उद्योग आहे त्यामध्ये नेत्यांनाहू यांना आपली हुकूमशाही शाबूत ठेवण्याचीही संधी दिसते आणि त्यामुळे हा निर्णय सत्तेसाठी सुद्धा घेतलेला आहे नरेंद्र मोदी त्यांना मित्र मानतात पण ही मैत्री भारताला परवडणार आहे का हा खरा प्रश्न आहे. चीन या युद्धात मुद्दामच अलिप्त राहील कारण त्यांच्यावर कोणताच हल्ला कुठलेच मुस्लिम राष्ट्र करणे शक्य नाही कारण सगळ्यांचे हितसंबंध चायना मध्ये गुंतलेले आहेत भारत तटस्थ राहिला तर भारतावर हल्ला करण्याचा उद्योग मुस्लिम राष्ट्रे करणार नाहीत अपवाद इराण आणि पाकिस्तान! या दोन राष्ट्रांच्या मुळे भारताचा पंगा होऊ शकतो आणि तसा तो झाला तर सर्वाधिक मोठा chaos मुस्लिम राष्ट्रांच्या आतच होईल कारण भारताशी संबंध कोणालाच बिघडवायचे नाहीत
एकंदरच गाजा पट्टीपासून सुरू झालेले हे युद्ध महायुद्धात परिवर्तित होऊ शकते ही शक्यता गृहीत धरूनच भारताला पावले टाकावी लागतील युद्ध हा फार महागडा धंदा आहे आणि तो त्यांनाच परवडतो ज्यांना शस्त्रे विकायची असतात
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment