मोक्ष LOVE
सौंदर्यतऱ्हा सादर होत आहेत हाताने केसाचे अश्व उधळणे ओठाचा चंबू करून बांबू लावणे बोटांचे सर्प नाकासमोरून ओढणे दोन बोटांनी डोळ्यातील पाण्यासमोर मासे बनवणे जाणीवपूर्वक स्तनखळी उघडी टाकणे पापण्या लवलवत विजांना धार काढणे कारण नसताना स्तनांना फुटबॉल बनवणे देहाच्या थेंबातून तयार होत जाणाऱ्या नद्या डोळे ओले होत नाहीत वासना ओल्या होतात शिट्या वाजवणाऱ्या मिठ्या गरम होणारे हात टेकाडापोटी काडकन मोडणारे पुरुष शेकोट्या पेटवायला अग्नीची साधना स्क्रीन नेमके किती स्कीन खातात ऑफिसमध्येसुद्धा वेळ वाया घालवणारे लोक डोळे भाजून घेऊन नेमके काय आत भाजतात भास भासतात की पोळतात? ब्युटी ही ड्रग बनत असेल तर नेमका कोणता ट्रॅफिक जाम होत असेल ? की हे सर्व स्ट्रेस बस्टर आहे ? मी विद्यार्थ्यांना आवरावे की सावरावे या विवंचनेत हा डिजिटल मधून वाहणारा निसर्ग आहे की डिजीरोगाची साथ? भासच स्टॅंडर्ड सेट करत चाललेले आणि दिवसेंदिवस फिके पडत चाललेले वास्तव मेकअपचा भडिमार अधिकाधिक स्वतःला आभासी ...