उत्तर पुरोगामी वाद आणि मंडल आयोग श्रीधर तिळवे नाईक आज 16 नोव्हेंबर मंडल आयोगाचा एका अर्थाने वाढदिवस ! मागच्या उत्तरपुरोगामीवादावरच्या लेखात आपण उत्तरपुरोगामीवाद हा कसा अटळ असतो हे थोडक्यात पाहिले आता आपण मंडल आयोगाचा यासंदर्भात विचार करू लाल बहादूर शास्त्री हे पुरोगामी वादाचे शेवटचे पंतप्रधान होय आणि त्यांनी ज्या तऱ्हेने युद्ध जिंकून सुद्धा युद्ध हरले म्हणजे युद्ध जिंकले आणि तहात हरले ते बघता रशिया मधल्या उत्तर पुरोगामी वादाने कसे आपले प्रेशर वाढवत नेले होते ते कळते साहजिकच या दबावाखाली इंदिरा गांधी सुद्धा होत्या उत्तर पुरोगामीवाद हा सोलुशन आहे अशी त्यांची मानसिकता बनत चालली होती आणि म्हणूनच त्यांनी एकाधिकारशाही स्वीकारून समाजवाद घटना दत्त केला आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण करून उत्तर पुरोगामी वादाच्या दृष्टीने दिशेने पावले टाकायला सुरुवात केली या सर्व विकासामध्ये त्यांची स्वतःची इच्छा किती आणि त्यांच्यावर रशिया मधल्या उत्तर पुरोगामी वादाने टाकलेले प्रेशर किती हा अजूनही प्रश्न आहे त्याचबरोबर काँग्रेसमध्ये अंतर्गत असलेल्या तरुणतुर्काचा उत्तर पुरोगामी वाद या काळामध्ये किती प...
Posts
Showing posts from December, 2024
FREEDOM SWATANTRYA DIN
- Get link
- X
- Other Apps
फेसबुक वर टाकलेली पोस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त १ श्रीधर तिळवे नाईक स्वातंत्र्य दिन आला की आपण एका विशिष्ट संदर्भात बोलतोय याची जाणीव लोकांना व्हायला लागते आणि लोक स्वातंत्र्याची चर्चा सुरू करतात यात अनेक प्रश्न असतात म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य कोणी मिळवून दिले स्वातंत्र्य खरोखरच मिळवले गेले की दिले गेले स्वातंत्र्यात कोणाचा काय रोल होता स्वातंत्र्य ही चळवळ होते की नाही ? आमच्या पिढीने काही स्वातंत्र्यसंग्राम बघितला नाही मात्र आम्ही आमच्या बापज्याद्यांच्याकडून त्या विषयाच्या कथा ऐकलेत(माझी स्वतःची फॅमिली ही गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होती ) त्यामुळे स्वातंत्र्याची आपण कल्पना करतो म्हणजे नेमकी काय कल्पना करतो किंवा काय विचार करतो हा प्रश्न कायमच माझ्या फॅमिलीत आणि माझ्या मनात गुंजणारा प्रश्न राहिला आहे साहजिकच स्वतःच्या दृष्टीने स्वातंत्र्याकडे पाहणे अटळ झाले मी आयएएसचा अभ्यास करत असताना बीए मध्ये हिस्टरी आणि राज्यशास्त्र असे विषय घेतले होते कारण आयएएससाठी हे दोनच विषय मी निवडणार होतो साहजिकच राज्यशास्त्राचा मी माझ्या स्टाईलने अभ्यास सुरू केला सुरुवातीला या...
- Get link
- X
- Other Apps
नामदेव ढसाळ यांचे समकालीन कवींच्या विषयीचे म्हणणे व वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक फेसबुक वर नामदेव ढसाळ यांनी अनुष्ठुभच्या नामदेव ढसाळ विशेष अंकात जी मुलाकात दिली होती त्यात त्यांच्या समकालीन कवींच्या विषयी त्यांनी जे म्हंटले होते ते फिरते आहे ढसाळांच्या सारख्या उत्तम कवीचे हे म्हणणे असल्याने त्याचा विचार करणे भाग आहे ढसाळ म्हणतात हे जे असं स्वतःच्या समकालीन लोकांच्या बद्दल बोलणं असतं ना ते फार महत्त्वाचं असतं . त्या त्या काळातल्या माणसांच्या इनसाइट्स काय होत्या हे स्पष्ट करतात या इन्साइट्स आपणही तपासायलाच हव्यात म्हणजे उदाहरणार्थ अरुण कोल्हटकर यांच्या कवितेत अतिवास्तववाद फार कमी आहे असे म्हणतात तर ते काही खरं नाही किंवा अरुण कोलटकर यांची ग्रोथ झाली नाही असं ते म्हणतात तर तसं दिसत नाही त्यांच्या काही कविता अद्भुत आहेत उदाहरणार्थ तक्ता ही कविता ही अस्सल सर रियल कविता आहे अशा किमान पाच कविता आहेतच नामदेव ढसाळ म्हणतात म्हणून आपण ते स्वीकारालाच हवे असे नाही त्यांची स्वतःची स्वतंत्र अशी कल्पनाशक्ती आहेच की ! आता वारकरी संप्रदायाच्या वारी विषयी अरुण कोल्हटकर यांच्यात का येते ...
क्रांती नवता आणि मोक्ष
- Get link
- X
- Other Apps
क्रांती नवता आणि मोक्ष गेली अनेक दशके मी क्रांती आणि नव्हता या दोन वेगळ्या गोष्टी म्हणूनच मांडतो आहे याचे कारण त्या तशा आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की क्रांती हा शब्द आपण अत्यंत स्वस्त केलेले प्रत्यक्षात तो जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्यामागे एक व्यापक असे होता त्यामागे एक संपूर्ण परिवर्तन अभिप्रेत होते जगामध्ये क्रांती क्रांती ह्या फक्त सातच झाल्या त्यातली पहिली क्रांती ही होमो इरेक्टर्स बनणे ही होती त्यानंतरची दुसरी क्रांती ही होमोसेपियन बनणे ही होती या होमोसे पेन बनण्यातून एक विशिष्ट जीवनशैली निर्माण झाली जिला आज आपण आदीम जीवनशैली म्हणतो ही आदिम जीवनशैली माणसाला येणाऱ्या अनुभवाच्या आधारे हवी होती तिचा मुख्य आधार श्रद्धा होती या श्रद्धेतून अनेक रुढी निर्माण झाल्या आणि त्यांचे हळूहळू कायदे बनले या काळामध्ये प्रत्येक टोळीच्या स्वतःच्या रुढी होत्या. या रूढीच कायदा बनले आणि त्यानुसारच टोळी चालत होती ही एक आदिम व्यवस्था होती जी हजारो वर्षे नीट चाललेली होती. हिला चॅलेंज देता येईल असे कधीच कोणाला वाटले नव्हते पण भगवान शंकर नावाची एक व्यक्ती निर्माण झाली आणि तिने हे सर्व काही ब...
MOKSH MILHALYANANTR KAY GHADTE
- Get link
- X
- Other Apps
मोक्ष मिळाल्यानंतर काय घडते श्रीधर तिळवे नाईक १ मोक्ष मिळाल्यानंतर देह संपतो असा एक फार जणांचा गैरसमज आहे देह संपत नाही तुम्हाला भूक लागते तहान लागते हागायला लागते तुम्हाला मुतायला लागते या सर्व गोष्टी मोक्ष मिळाल्यानंतर सुद्धा सुरू असतात याबाबतीत ही भाषा मी मुद्दामच वापरतोय कारण लोकांच्या फार रोमँटिक कल्पना असतात देह असतो पण त्याचे ऑपरेशन त्याची ऑपरेटिंग सिस्टीम ही मात्र अहंकाराच्या ताब्यात राहत नाही ती शून्याच्या ताब्यात जाते शैवांच्या भाषेत ती शिवाच्या ताब्यात जाते बौद्धांच्या भाषेत ती शून्याच्या ताब्यात जाते जैनांच्या भाषेत ती कैवल्याच्या ताब्यात जाते ब्रह्मसुत्रांच्या व उपनिषदाच्या भाषेत ती ब्रह्मच्या ताब्यात जाते मनुष्य तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे उरलो उपकारापुरता होऊन जातो यातला जो उपकार आहे त्याचा अर्थ एहसान असा नाही उप आकार असा आहे मूळ आकार शून्याचा आणि देह केवळ उप आकार बनतो २ मोक्ष मिळाल्यानंतर ज्या काही गोष्टी घडतात त्यातली एक गोष्ट म्हणजे स्वप्न पडणे बंद होते पण याचाही अर्थ अनेकांनी चुकीचा लावलेला आहे प्रत्यक्षात स्वप्न मधले स्व जाते बाकी फायलींगचे जे काम असते त...
मोक्ष मुद्रा
- Get link
- X
- Other Apps
फ्रस्टेशन येणारच होतं आलं आधी जे कृष्णमूर्तींना आलं होतं त्यांचं कुणीच ऐकत नाही म्हणून आणि व्याकुळ होऊन विचारलं होतं "मी काय म्हणतोय ते समजतंय का ?" आणि आता तुम्ही ! धुसफुसीचा फुसफुसता अजगर मी म्हणतो आश्रम काढायचाच कशाला ? तुम्हाला आश्रमात राहून मोक्ष मिळाला होता ? मोक्ष ही ज्या त्या शरीराची वैयक्तिक कमाई आहे असोशी तीव्र झाल्याशिवाय जागची हालत नाही हे असे करोडो फॉलोअर्स काय कामाचे ? काही तर इतके शहाणे मीच प्रॉफेट म्हणून मोकळे जर सर्वच देवाचे समान पुत्र कन्या तर सर्वच प्रॉफेट नकोत आपापल्या आयुष्याचे /? मोक्ष वाटता येत नाही कारण तो सर्वत्र असतो जो अनंत आहे तो भांड्यात कसा मावणार ? भांड फुटावं लागतं त्यासाठी लोक भांड्यालाच जपत बसतात मग ते फुटणार कसं ? शटर ओढा आता प्रवचन त्यांनाच द्या ज्यांना गरज आहे चालत येतीलच बाकी ह्या वाजणाऱ्या करोडया टाळ्या भ्रमात वाजतायत भ्रमातून धुकं टाळ्या वाजवतंय या श्रीधर तिळवे नाईक (मोक्ष ह्या सिरींजमधील...
शैव २०२३
- Get link
- X
- Other Apps
शैव धर्माची मूळ तत्वे श्रीधर तिळवे शैव धर्मामध्ये अनेक वेगवेगळे संप्रदाय वेगवेगळी दर्शन सध्या दिसत असली तरी त्यांची काही मूलभूत तत्वे आहेत जी त्यांना समानता देतात ही तत्वे कुठल्याच दर्शनाला वर्ज्य नाहीत त्यामुळे त्यांच्यावर बोलणे अत्यंत आवश्यक आहे शैव धर्माचे पाच मुलाधार आहेत पहिला आधार शिव हेच अंतिम तत्व ! शिव हेच आरंभ तत्व ! त्याला ना जन्म आहे ना मृत्यू ! शिवात जीव विलीन होणे म्हणजेच मोक्ष होय आणि माणसाचा जन्म स्वतःच्या मोक्षासाठी आणि इतरांना मोक्ष मिळवून देण्यासाठी आहे दुसरा मूलाधार शक्ती आहे शक्ती शिवाच्या साह्याने ऍक्टिव्ह होते कार्यरत होते आणि तिच्यामुळेच जिला आज आपण अनंत म्हणतो ते येते साहजिकच सगळ्या प्रसरणामागे ही शक्ती असते तर सगळ्या संकुचनामागे शिव असते तिसरा मूलाधार हा संसार आहे शिव आणि शक्ती या दोघांनी हा संसार थाटलेला आहे ह्याला पसाराही म्हणतात हा संसार बिलियनस् ट्रिलियनस ब्रम्हांडांनी बनलेला आहे त्यातल्या प्रत्येकात खर्व निखर्व पद्म महापद्मामध्ये आकाशगंगा आहेत आजही याचा आकार कळत नाही या संसारात आपण जीव आहोत आणि प्रत्येक जीवाचे कार्य संसार उत्तम...