Posts

Showing posts from January, 2025

Yuval Harari नारळीकर

 चौथ्या नवतेची दुसरी पिढी डॉ युवाल नोआ हरारी  १ महाराष्ट्रात अलीकडे युवाल हरारी याची चर्चा जोरदार चालू आहे याचे कारण अमेरिकेतल्या पॉप लिटरेचरची एकंदरच जगभर असलेली लोकप्रियता आहे अत्यंत सोप्या भाषेत वैज्ञानिक सत्य सांगणे हे सायंटिफिक पॉप लिटरेचरचे वैशिष्ट्य असते ते हरारीच्या लेखनामध्ये ओतप्रत भरलेले आहे तो सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि आश्चर्यकारकरीत्या हे करताना तो व पु काळ्यांच्याइतकाच लाघवी असतो साहजिकच अशा प्रकारचे वाचन करणाऱ्या लोकांना तो एक देवदूत वाटला तर आश्चर्य नाही  आमच्या पिढीने चौथ्या नवतेचे काही प्रश्न निर्माण केले त्यांची स्वतःच्या डाटा उपलब्धतेनुसार उत्तरेही दिली आणि हे प्रश्न आता अधिक व्यापक डाटा घेऊन दुसऱ्या पिढीत सुद्धा स्पष्ट आणि स्वच्छपणे झिरपलेले आहेत हे आपणाला हरारीच्या लेखनावरून स्पष्टपणे प्रतीत होते मराठीत त्याचा अनुवाद होतो हा नेहमीच मला पॉझिटिव्ह इव्हेंट वाटत असतो याचे कारण मराठीमध्ये चौथी नवता पसरवायची असेल तर असे सर्व वैज्ञानिक पॉप लिटरेचर अनुवादित होणे गरजेचे आहे जेणेकरून सामान्य माणूस सुद्धा त्याच्या भोवता...
 चौथी नवता आणि रामायण श्रीधर तिळवे नाईक  कुठलीही जूनता व उत्तरता ही नवतेला भूतकाळाकडे घेऊन जाते उत्तराधुनिक भारतात हे घडले त्यातून एकीकडे राममंदीर आंदोलन जन्मले व रामानंद सागर ह्यांचे रामायण ! ह्यातून एक रामलहर जन्मली व आज तिचे पर्यवसान प्रत्यक्ष राम मंदिरात झाले आहे  ह्यानिमित्त शंकराचार्य विरुद्ध मोदी असा जो वाद झाला तो लक्षणीय होता  आद्य शंकराचार्यांनी पाचव्या शतकात झालेल्या अवस्था तंत्राच्या आचार्य शंकर ह्यांनी दिलेल्या १ शिव २ शक्ती ३ गणपती ४ कार्तिकेय व ५ सूर्य ह्या शैव पंचायनात बदल घडवून १ शिव २ शक्ती ३ गणपती ४ कार्तिकेय व ५ विष्णू असे नवे हिंदू पंचायतन देऊन हिंदू धर्माची स्थापना केली शैव व वैष्णव ह्यांच्यात सुरु झालेले वाद मिटावेत म्हणून त्यांनी हे केलं पण हे करताना इहलोकाविषयी ते उदासीन असल्याने त्यांनी वेदप्रामाण्य व स्मृतीप्रमाण्य स्वीकारले जी घोडचूक होती मात्र मोक्षाचा अधिकार सर्वांना दिला  ब्राम्हण धर्म व वैदिक श्रद्धा हे यज्ञ केंद्री होते वैष्णवांनी शैवांची पूजापद्धती स्वीकारली मात्र देव वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे यूरेशियनच ठेवले कुठलीही मूर्ती...

फेसबुक वर गाजलेल्या कविता

 फेसबुक वर गाजलेल्या कविता न्यू कॉलेजमधल्या कविता  तेव्हापासून  तिच्या दोन स्तनातून तिने दोन पहाड काढले  व पाण्यात बुडवले  तर नदी तयार झाली  तिच्या नाकातून अनेक नाके निघाली  तर तिने त्यांना झाड बनवून  ती नदीकिनारी लावली  तिचा मोह पडून  आभाळ तिच्या ओठात वाकले तर  त्या चुंबनाचा सूर्य झाला  मग ती चालली तिथे कुरणे निर्माण झाली  आणि तिच्या डोळ्यांपासून करुणा पाजणाऱ्या  गायी तयार झाल्या  मी तिच्या प्रेमात पडलो  आणि म्हणालो  " मला तुझा प्रियकर बनव " तर म्हणाली  "तू माझा मुलगा आहेस " तेव्हापासून मी आईचा कवी झालो  श्रीधर तिळवे नाईक  (एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून ) कॅम्पुटर बरोबर रोमान्स सुरू झाला आहे  एक अशक्य असा डान्स सुरू झाला आहे  वाटले नव्हते कधी मला मीही याच्या प्रेमात पडेन  चिन्हांच्यातला ट्रान्स सुरू झाला आहे  कधीच आदर दिला नव्हता मी कुठल्या उंदराला  बिळात घुसण्याचा चान्स सुरू झाला आहे  प्रथमच मला गोष्टींचे वेग उम जायला लागल...

उत्तर प्रस्तावना

 नाव ठेवण्याचे उद्योग आणि युरेका डेकॅथलॉन  माझ्या एका जुन्या मित्रांने तू युरेका हे नाव बदलून डे कॅथलोन हे नाव का निवडले असा प्रश्न विचारलाय  जवळजवळ 1992 पर्यंत मी १ गझल २ अफवा ३ युरेका ४ महानुभव या चार गावांचा विचार करत होतो म्हणजे गझलचे चार खंड काढायचे अफवाचे दोन खंड काढायचे युरेकाचे दहा खंड काढायचे आणि महानुभवचे तीन खंड काढायचे असे हे प्लॅनिंग होते यातील अफवा हा नंतर एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार म्हणून आल्याने प्रश्न मिटला खरे तर काव्यसंग्रहाला काय नावे द्यायचे हा माझ्या पुढे कायमच प्रश्न असतो कारण तुमच्या कवितांचे संपूर्ण सत्व त्या काव्यसंग्रहाच्या नावामध्ये उमटलेले असते आणि मी इतक्या विविधतेत नांदणारा कवी आहे की नावामध्ये सगळं कसं मॅनेज करायचा हा फार मोठा प्रश्न असतो  एवढे का हे नाव मी ठेवले होते कारण मला कविता सापडली होती आणि माझ्यासाठी तो अतिशय आनंदाचा क्षण होता त्यातून ते नाव ठेवले परंतु सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या केरीज खेरीज त्यामागचा इतिहास अनेकांना माहित नाही असे माझ्या लक्षात आले शिवाय दहाच्या दहा खंडांना कसे काय युरेका हे नाव द्यायचे असा प्रश्न नि...

net prem

 net prem चाव्या एकमेकांना देतांना विश्वासार्हतेच्या हातांचे झालेले ऍपल श्रीधर तिळवे नाईक  चाव्या एकमेकांना देतांना विश्वासार्हतेचे झालेले अँपल  संगणकाचा दिलेला ताबा पासवर्ड द्यावा कि नाही  फर्निचरच्या मांडणीला छेद बसू शकतात सांडणीचे  टेबलाचा पाय काढून पाया हलवण्याची होऊ शकणारी घाई  तुझ्या डोळ्यात प्रेम आणि काम पापण्यांचे तरुण डोंगर  लग्न केल्याशिवाय पुण्य होत नाही लग्नापूर्वीचा संभोग पाप  देताना विसरलो कि माझ्याकडे डुप्लिकेट नाही चावीची  आणि समोर मीच खरेदी केलेले कुलूप मिश्या पिळत अफाट  पुन्हा येऊ कि फोन करू कि पुन्हा मागू चावी ओरिजनल  तुला काय वाटेल कि कमी होईल ट्रस्ट सगळं फिस्कटेल  मी मोबाईल चाळवतोय तुझ्या फोन नम्बरशी चंचल चाळा  सतत भास कि तूच परतलीयेस घेऊन चावी आणि डेल  मी बसलोय माझ्या दारात तुझ्या प्रेमात पकडून चौकट डावी  ताटकळणारे डोळे ज्यांना माहीत नाही कधी परतणार ओरिजनल चावी  श्रीधर तिळवे नाईक  {नेट सिरींजमधील नेट प्रेम ह्या काव्य फाईलीतून } कॉप्या करणारी मुलगी म्हणते  आय लव्ह यु  स्वत...

नेट बॉलीवूड

सगळे निघून गेलेत बेकायदेशीर कृत्य करायला  मी बसलोय माझ्यात कायदेशीर  ज्याला कायद्याचा सन्मान होता  लोकांना धाक उरलेला नाही  अटक होण्याची भीती नाही  लोक माजलेत बेकायदेशीरपणात  सामूहिक झालेत  जो कायदेशीर आहे त्याच्या विरोधात  त्यांना माहित आहे  हा एकटाच पडणार  मलाही माहित आहे  मी एकटाच पडणार  एकटा पडण्याची भीती मला कधीच वाटली नाही  ज्याला शिव हवा असतो  त्याला जीव एकटा असला काय किंवा नसला काय  काळीज कालवायला बघतात लोक  त्यांना रक्ताची आमटी करायला आवडते  मी थाळीत बसायला नकार देतो  संन्याशाने स्वतःसाठी संपत्ती बाळगू नये  मी बाळगत नाही  पण त्याचमुळे अनेकांची अडचण  तणतण  त्यांना नैतिक माणूस खणखण वाटते  नको असलेली  इको असलेली  जिला इगो म्हणून बदनाम करता येते  शॉर्टकटचा दंश प्रत्येकाला  साप खेळवण्याची हौस प्रत्येकात  सरकारला फसवले की सगळे सार्थक  मोक्ष मिळवणाऱ्यांना हा हंगाम परवडत नाही  त्यांना फुले सुद्धा वसंतात घ्यायला लागतात  ऋतू संयम शिकव...

चॅनेल लव्ह सेक्स अँड एल्सेट्रा

Jan  नकार स्वीकारताना श्रीधर तिळवे नाईक ऐनवेळी आलेला नको  आणि मी क्षणात झालेलो ठप्प  झाडे खुजी पण बाहेर इको  भयावह  सार्थकतेकडे निघालेला पिसारा  झडून झडून पाचोळा  तू डिजिटलवरून बोलवलं  आणि आता बॉडियलवर नाकारतेयस  कम्युनिकेशन म्हणजे मांस नव्हे  इंटरनेटचा एक छत्री अंमल म्हणजे  छत्री न्हवे  पावसाळा तर नव्हेच नव्हे  एकमेकाला काय प्रोजेक्ट केले ? आणि एकमेकासाठी आता आपण काय आहोत ? तुझ्या चेहऱ्याच्या वाफा गरम झाल्या होत्या  आणि अचानक किटली काळजातनं उडाली  शांत झाली  त्वचेवर उमललेला मुलायम स्पर्शसंभार  भार वाटायला लागला  बॉडीमध्ये ना कोळसा जळतोय  ना स्क्रीन  आमंत्रण म्हणजे लग्न न्हवते तर  दूध नासले म्हणून मी तुला दोष देत नाही  मी डिजिटल अग्नीवर भाळलो  आणि मला चेक करण्यासाठी देहाचा  एकही रीयल नाका उपलब्ध नव्हता  या मर्यादेवर मी थोडासा नाराज आहे  हे वेळ वाया गेल्याचे दुःख आहे का ? क्षण मामुली वाटतात जेव्हा ते सफल होतात  आता एकेक क्षण भरघोस  मी हलका व्हायला आल...

Cricket

 Cricket  क्रिकेट : प्रादेशिकता , देशता आणि जागतिकीकरण लेखक श्रीधर तिळवे नाईक  खरे तर पाचवी कसोटी जसप्रीत बुमरा बॉलिंग टाकणार नाही म्हटल्यावर मी बघणे सोडून दिले कारण मुख्य शस्त्र नसेल तर लढाईला काही अर्थ नसतो सचिन तेंडुलकरच्या सुरुवातीच्या काळात सचिन गेला की टीव्ही ऑफ व्हायचे तशी ही अवस्था आहे जसप्रीत च्या बाजूने बघितले तर त्याची ती अचीवमेंट आहे पण भारतीय संघाच्या दृष्टीने पाहिले तर हे अध:पतन आहे  पराभवाची खरी कारणे भारतीय फलंदाजी आहे मी विश्वचषकाच्या विश्लेषणात स्पष्ट म्हटले होते की हा बुमराहचा एक हाती विजय आहे ऑस्ट्रेलियात सुद्धा फार काही वेगळे घडले नाही पण मर्यादित षटके आणि कसोटी यामध्ये फरक असतो इथे एक खेळाडू पुरत नाही आणि सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीचे तिसरे ते सहावे वर्ष आपण पाहिले की त्यावेळी हे अनेकदा घडताना पाहिलेले आता आठवत आहे  या मालिकेमध्ये स्पष्टपणे दिसलेली गोष्ट म्हणजे रोहित शर्मा हा कसोटी प्लेयर नाही ही गोष्ट ! तो जर स्वतः स्वीकारत नसेल तर त्याला ती स्वीकारायला लावावी लागेल दुर्दैवाने हे घडत नाही दुसरी गोष्ट गौतम गंभीर याने स्पष्टपणे सांगितलेले ...

Aesthetics

 सौंदर्यशास्त्र विनायक श्रीधर तिळवे नाईक कला अनुभव आणि कलेचे उद्देश श्रीधर तिळवे नाईक कलेचे तीन मुख्य उद्देश  १ अनुभवाची अभिव्यक्ती २ अनुभव समृद्धी ३ अनुभव वृद्धी  हे आहेत  अनेकदा आपल्याला आयुष्यात अनुभव येत असतात परंतु आपल्याकडे त्यांना व्यक्त करायला लागणारी अभिव्यक्तीची ताकद नसते त्यामुळे अनेकदा असे होते की अनुभव तर आलेला असतो परंतु आपल्याला अभिव्यक्ती करता न आल्याने जेव्हा कोणी कलावंत अशी अभिव्यक्ती करतो तेव्हा आपण म्हणतो की अरे माझ्या मनातलेच तर तू बोललास आणि लिहिलास याला मी अनुभव अभिव्यक्ती म्हणतो स्वतःच्याच अनुभवाची अभिव्यक्ती झालेली आहे असे वाटणे हे हिते वारंवार घडलेले आहे कोसला या कादंबरीमध्ये हॉस्टेलचे अनुभव हा फार मोठा भाग आहे अरे हे तर मी अनुभवलेच होते पण नेमाडे यांनी ते अनुभव भाषेत मस्त पकडले अशी अनेकांची प्रतिक्रिया असते  अनुभव समृद्धी मध्ये मात्र आपल्याला असलेला अनुभव तो कडा असतो कलावंतामुळे आपल्याला त्या अनुभवाचे अनेक पदर उलगडत जातात जे आपण अनुभव घेताना अनुभवलेले नसतात साहजिकच इथे अनुभव आपला असला तरी लेखकाचा अनुभव आपला अनुभव समृद्ध करतो याला मी अ...