Posts

Showing posts from June, 2025

मोक्ष LOVE

 सौंदर्यतऱ्हा सादर होत आहेत  हाताने केसाचे अश्व उधळणे  ओठाचा चंबू करून बांबू लावणे  बोटांचे सर्प नाकासमोरून ओढणे  दोन बोटांनी डोळ्यातील पाण्यासमोर मासे बनवणे  जाणीवपूर्वक स्तनखळी उघडी टाकणे  पापण्या लवलवत विजांना धार काढणे  कारण नसताना स्तनांना फुटबॉल बनवणे  देहाच्या थेंबातून तयार होत जाणाऱ्या नद्या  डोळे ओले होत नाहीत वासना ओल्या होतात  शिट्या वाजवणाऱ्या मिठ्या  गरम होणारे हात  टेकाडापोटी काडकन मोडणारे पुरुष  शेकोट्या पेटवायला अग्नीची साधना  स्क्रीन नेमके किती स्कीन खातात  ऑफिसमध्येसुद्धा वेळ वाया घालवणारे लोक  डोळे भाजून घेऊन नेमके काय आत भाजतात  भास भासतात की पोळतात? ब्युटी ही ड्रग बनत असेल  तर नेमका कोणता ट्रॅफिक  जाम होत असेल ? की हे सर्व स्ट्रेस बस्टर आहे ? मी विद्यार्थ्यांना आवरावे की सावरावे या विवंचनेत  हा डिजिटल मधून वाहणारा निसर्ग आहे की डिजीरोगाची साथ? भासच स्टॅंडर्ड सेट करत चाललेले  आणि दिवसेंदिवस फिके पडत चाललेले वास्तव  मेकअपचा भडिमार अधिकाधिक स्वतःला आभासी ...

DHARM ANI CHAUTHI NAVTA

  Yusuf Shaikh हे आपणा सर्वांच्या बाबतीतच गुंतागुंतीचे आहे मी ज्या गावात वाढलो ते गोव्याच्या माझ्या मामाच्या म्हणजे रोहिदास नाईक यांच्या आमदारकी क्षेत्रात येत होते आणि मामाने आणि माझ्या वडिलांच्या पिढीने ते गाव प्रथम शाळा काढून पुरोगामी बनवले नंतर आधुनिक बनवले आणि आता प्रत्येकाच्या घरी कम्प्युटर जाईल अशा तऱ्हेने योजना केली. अलीकडे त्याचे पर्यावरण शाबूत रहावे म्हणून माझा पुतण्या सुरेल तिळवे हा धडपडत असतो आयडियालॉजीचा संबंध हा पुरोगामी वादाशी आहे पण दुर्दैवाने आपल्याकडे आधुनिक हा शब्द पुरोगामी म्हणूनच वापरला जातो वास्तविक या दोन गोष्टी वेगळ्या आहेत पण मुळात पाश्चात्त्य देशातच याबाबतीत प्रचंड घोळ आहेत मॉडर्न या शब्दाचा अर्थ पुरोगामी असाही होतो आणि आधुनिकही! अलीकडे तिकडे आधुनिकता असा शब्द ते वापरतात आणि आधुनिकवाद आणि आधुनिकतावाद असा फरक करतात मराठीत सुदेवाने पुरोगामी असा वेगळा शब्द योजता येतो म्हणून मी पुरोगामी म्हणजे आयडियालॉजिकलीं कमिटेड असा अर्थ घेतो तर आधुनिक याचा अर्थ आयडियालॉजीला नकार देऊन इंडस्ट्रियल झोनचा विचार करणारा इंडस्ट्रियल कार्पोरेट असा घेतो मुळात हा फरक भांडवलशाही आणि ...
 इतिहासाचा इतिहास , फिनामिनॉलॉजी, उत्तर आधुनिक इतिहास आणि शैव श्रीधर तिळवे नाईक शैव लोकांचा इतिहास कसा लिहायचा किंवा कसा लिहिला जात होता आणि पुढे कसा लिहावा हा कायमच सर्व शैव इतिहासकारांच्या पुढचा प्रश्न आहे  शैव श्रुती मधल्या लोकांच्या मध्ये अनेकदा शंकराचा उल्लेख निळकंठ असा होतो या उल्लेखा मागे नेमके काय आहे याचीही कल्पना सध्या अनेकांना नाही इतके आपण शैव परंपरेपासून तुटलेलो आहोत समुद्रमंथनाच्या दंतकथेत गटांगळ्या खात आहोत नीलकंठ याचा अर्थ आहे इतिहास कंठीत करणारा ! त्यामुळेच युवान श्र्वांगच्या प्रवासवर्णनामध्ये इतिहास सर्व प्रादेशिक राजवटी जतन करत असल्याचा उल्लेख जेव्हा येतो तेव्हा त्याचा अर्थ आपणाला कळत नाही त्याच्या प्रवास वर्णनामध्ये प्रादेशिक राजवटींनी लिहिलेल्या इतिहासाचा  उल्लेख निलपिठ असा येतो आणि तो शंकराच्या नीलकंठावरून आलेला आहे मौखिक परंपरे कडून लिखित निळ्या पत्रांच्यावर इतिहास या काळात शि फ्ट झालेला आहे लिहिला गेलेला आहे आणि त्यांना हे निल पत्र किंवा निलपीठ म्हटले जात असे असो युरोपियन देशांमध्ये सुद्धा ब्लू डॉक्युमेंट्स हा शब्द आहेच आता इकडून तिकडे गेले की तिकड...

A I

 कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा करताना कायमच कृत्रिम बुद्धिमत्ता ( क्रुबु)ही संपूर्ण मानव जातीला रिप्लेस करेल असे म्हटले जाते प्रत्यक्षामध्ये एक नवीन प्रकारची चिन्ह सत्ता उदयाला येईल आणि त्याबरोबर साहजिकच अर्थ सत्ता आणि धर्मसत्ता उदयाला येईल त्यांचे स्वरूप नेमके कसे असणार हे आजही स्पष्ट नाही मात्र ज्याच्या हातात चिन्हसृष्टी तो या नवीन युगाचे भाष्य घडवत जाईल साहजिकच मानवी जीवनाला या सगळ्या चिन्हसृष्टीमध्ये तुम्ही कसा सार्थ चिन्हार्थ पुरवणार हा फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे माणसाला स्वतःच्या आयुष्याला अर्थ द्यावा लागतो कारण तो मोक्षाकडे वळत नाही आणि कामाबाबत असफल होतो. साहजिकच त्याचा सगळा खेळ अर्थ ह्या अक्षाभोवती घुटमळत राहतो अर्थ हा नेहमी संसार केंद्री असतो साहजिकच या संसारामध्ये स्वतःच्या आयुष्याचे सार्थकत्व तो ठरवायला धडपडायला लागतो आणि त्यातूनच मग त्याला पैसे हवे असतात कीर्ती हवी असती पैशांमध्ये सार्थकता स्वीकारणाऱ्या लोकांची संख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या युगात कदाचित कमी होत जाईल पर्क्स आणि इतर सर्व सवलती work कल्चर वाढवत नाहीत असा त्याला साक्षात्कार होईल मनुष्याच्या मूळ...
 शंकर शंभोपूर्व समाज श्रीधर तिळवे नाईक १ युरेशियन स्थलांतरांच्या आधीची दोन आफ्रिकन स्थलांतरे श्रीधर तिळवे नाईक भारताच्या इतिहासाची सुरुवात आर्यांच्या पासून करण्याची जी खोड आपल्याला लागलेली आहे तिने भारतीय इतिहास लिहिण्यामध्ये प्रचंड अडथळे निर्माण केलेले आहेत  भारतामध्ये ज्यांना इंडियन म्हणता येईल होमो इंडियन म्हणता येईल असे मानव जातीचे एक वेगळे रूप अस्तित्वात असावे आणि ते होमोसेपीयन यांचे भाऊरूप असावे  आफ्रिकेतून भारतामध्ये प्रामुख्याने तीन स्थलांतरित झाली यातील पहिले स्थलांतर हे समुद्राच्या मार्गाने दक्षिण भारतात झाले दुसरे स्थलांतर हे व्हाया आशिया युरोप  करत हिमालयाच्या पायथ्याशी विसावले आणि तिसरे स्थलांतर हे इराण मार्गे प्रवास करत संपूर्ण भारतभर पसरले या तिन्ही स्थलांतरांचा विचार आता आपण केला पाहिजे कारण आपणापुढे दोनच पर्याय आहेत एक तर आऊट ऑफ आफ्रिका हा सिद्धांत स्वीकार किंवा होमो इंडियन सिद्धांत ज्यामध्ये माणसाची एक स्वतंत्र प्रजाती जी नंतर भारतात आलेल्या होमोसेपियनशी संकरित झाली आणि जिच्यातून सिंधू संस्कृतीचा एक विशाल पट निर्माण झाला सिंधू संस्कृती ही होमोसोपियन...
itihasachya nivajanikarnache prashn gayab kelele ahe
 तिसरे महायुद्ध दारात आले आहे का श्रीधर तिळवे नाईक  इस्लाम आणि इस्लामेतर हा धर्म संघर्ष इस्लाम जन्मल्यापासून सुरू आहे तो कधी थांबण्याची शक्यता ही नाही कारण इस्लामचे अंतर्गत रचनाच तशी आहे ते बदलण्यासाठी नवीन प्रॉफेट ची शक्यता असावी लागते ती शक्यता ही मोहम्मद पैगंबर यांना अंतिम प्रेषित मानल्याने शक्य होत नाही त्यामुळे ही एक बंद झालेली वाट आहे आणि आश्चर्यकारकरीत्या या बंद असणाऱ्या किल्ल्यामध्ये संपूर्ण जग प्रवेश करत आहे ज्यांना ज्यांना पुरोगामी वाद आणि आधुनिक वाद झेपत नाही असे सारे लोक मागच्या दाराने इस्लाममध्ये घुसत असतात त्यामुळे इस्लामिक लोकांची संख्या वाढते आहे हा संघर्ष अस्तित्वात नाही अशी कल्पना करून काही लोक वाळूत डोके खूपसून बसलेले आहेत ही सुद्धा एक टिपिकल हिंदू प्रवृत्ती आहे परिणाम इतकाच झालाय की हिंदू लोकांच्या हातातून त्यांचा ७०% भूभाग हळूहळू निघून गेलेला आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याबद्दलही काही वाटणे आता उरलेले नाही हिंदूंना बधिर करण्यामध्ये सर्वाधिक वाटा हा ब्राह्मण्याचा आहे ब्राह्मण धर्माने स्वतः संवेदनशीलता गमावलीच पण त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतर सर्व हिंदवी धर...
 परिपुर्ती श्रीधर तिळवे नाईक आयुष्यात कळायला लागल्यापासून काही गोष्टी ठरवल्या होत्या आजच्या भाषेत बकेट लिस्ट तयार केली होती पुढे मोक्ष लागला आता म्हणू शकतो की ही सर्वच्या सर्व लिस्ट पूर्ण झाली ती पूर्ण करण्यासाठी मी काही फार मेहनत केली असे म्हणवत नाही पण शंकर म्हणतात तुम्ही मोक्षाची काळजी घ्या मोक्ष तुमची काळजी घेईल बुद्ध म्हणतो तुम्ही धम्माची काळजी घ्या धम्म तुमची काळजी घेईल किंवा जे कृष्णमूर्ती म्हणतात तुम्ही सत्याची काळजी घ्या सत्य तुमची काळजी घेईल तसे काहीतरी झाले बहुदा! मी काही ठरवून गोष्टी केल्या नाहीत जगत गेलो जगता जगता गोष्टी होत गेल्या माझ्या बकेट गोष्टी कधीच सामूहिक किंवा सामाजिक नव्हत्या मला काही गोष्टी करायच्या होत्या त्या मी केल्या पण त्याही काही जीव खाऊन मागे लागलोय असं काही झालं नाही बस एखाद्या जंगलातून जावे आणि जंगलातल्या प्रत्येक झाडाने तुम्हाला आवश्यक तसे फळ तुमच्या देहाच्या झोळीत टाकावे तसे काहीसे घडलेले आहे एका अर्थाने सांगायचे तर यात्रा संपूर्ण आणि सफल झाली  आता समाधीचा विचार करता येईल पण तेही काही नीट ठरवून वगैरे मी करणार नाही आतून आदेश आला की मी काहीही ...

इतिहास आणि कालगणना श्रीधर तिळबे

 भारतीय इतिहासातील कालगणनेचे प्रश्न १ श्रीधर तिळवे नाईक  शैव श्रुती मधल्या लोकांच्या मध्ये अनेकदा शंकराचा उल्लेख निळकंठ असा होतो या उल्लेखा मागे नेमके काय आहे याचीही कल्पना सध्या अनेकांना नाही  नीलकंठ याचा अर्थ आहे इतिहास कंठीत करणारा ! त्यामुळेच युवान स्वांग च्या प्रवासवर्णनामध्ये इतिहास सर्व प्रादेशिक राजवटी जतन करत असल्याचा उल्लेख येतो. मात्र त्यांचा उल्लेख निलपिठ असा येतो आणि तो शंकराच्या नीलकंठावरून आलेला आहे इतिहास आणि पुराने या दोन गोष्टी वेगळ्या मांडल्या जात होत्या  लोकांच्या मध्ये 1000 नंतर सर्वसाधारणपणे दंतकथेच्या स्वरूपातला इतिहास हाच भारतात जास्त प्रचलित झाला होता पण निदान बाणाच्या कालखंडात तरी गोष्ट वेगळी असावी बाणाच्या कादंबरी या ग्रंथात राजकुमार चंद्रपीड याला जे शिक्षण दिलेले आहे त्यात महाभारत इतिहास पुराण आणि रामायण एवढेच विषय शिकवले जात होते असे दिसते याशिवाय प्रबंध, कहानी यांचाही समावेश दिसतो हे सर्व पौराणिक धर्माचे लक्षण आहे हे तर उघडच आहे आणि पौराणिक धर्मात वाढलेल्या राजकुमारांचे काय होणार ? प्रश्न इतकाच आहे की पुराण आणि इतिहास या दोन गोष्टी वेगळ...