शैव उत्सव
मोक्षदा एकादशी बद्दल प्रश्न विचारला आहे म्हणून सांगतो मोक्षदा एकादशी म्हणजे मोक्ष मिळवण्याचा ठाम निश्चय करून भगवान शंकरांनी कैलासाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले तो दिवस मोक्षाच्या दिशेने मानव जातीने टाकलेले हे पहिले पाऊल होते म्हणून ते साजरे केले जाते मधल्या काळात मोक्षदा एकादशी गायब झाली होती परंतु पुन्हा एकदा तिचे पुनर्जीवन झालेले दिसते या एकादशीलाच वैष्णव लोकांनी गीता जयंती मानलेले आहे कारण या दिवशी अर्जुनाला भगवदगीता सांगितली गेली अशी त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे वैष्णवांच्या दृष्टीनेही हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे एकंदरच मोक्षाच्या संदर्भात हा दिवस अतिशय महत्त्वाचा असे म्हणायला हरकत नाही हा दिवस कसा साजरा करायचा याची एक पद्धत आहे सर्वसाधारणपणे तुमच्या आसपास ज्याला मोक्ष मिळालेला आहे त्याच्याकडे जाऊन आज मोक्षाची दीक्षा घेतली जाते कोणी आसपास नसेल तर मग शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करणे, अभिप्रेत आहे तुम्ही योगी असाल तर आज संपूर्ण दिवसभर राजयोग करणे गरजेचे आहे तुम्ही ज्ञानोपायी असाल तर तर आजच्या दिवशी ज्ञानो पाय अंमलात आणणे गरजेचे आहे हीच गोष्ट तंत्र उपाय आणि क्रि...